तांबवेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सलग तिसऱ्या वर्षी विक्रमी रक्तदान

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | युवकांनी छ. शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सामाजिक भान ठेवून रक्तदान शिबिराचा राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. गेल्या तीन वर्षापासून तांबवे येथील युवकांनी समाजाला एक दिशा देणारा उपक्रम राबविला आहे. पुढील पिढी घडविण्यासाठी छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असते, त्यासाठी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त पुढील पिढीला आदर्शवत असा प्रदिप दादा मित्र परिवाराकडून साजरा केला जात आहे. तांबवेत सलग तिसऱ्या वर्षी विक्रमी रक्तदान युवकांनी केले जाते, ही अभिमानाची बाब असल्याचे गाैरवोद्गार युवानेते यशराज देसाई यांनी काढले.

तांबवे येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील यांच्या प्रदिप दादा मित्रपरिवार यांनी रक्तदान शिबिरात ते बोलत होते. शिबिराचे उदघाटन संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. रक्तदान शिबिरात 90 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. सदस्या विजयाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, ग्रामसेवक टी. एल. चव्हाण, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, रयत कारखाना ऊस पुरवठा अधिकारी महादेव पाटील, गुणवंत पाटील, माजी प्राचार्य तात्यासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवानंद राऊत आदी उपस्थिती होती.

प्रदिप पाटील म्हणाले, आमच्या तांबवे गावातील युवक अत्यंत चांगला उपक्रम राबवत आहेत. कोरोना काळातही रक्ताची गरज असताना युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. छ. शिवाजी महाराज यांना अपेक्षित असे युवक कार्य करत आहेत. या शिबिरात पत्रकार दिपक पवार, विशाल पाटील, वैभव शिंदे, संभाजी शिंदे यांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रदिप पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सतिश यादव व आभार विशाल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here