संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंद करा – सकल धनगर समाजाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | काल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी केल्यामुळे संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्यामुळे धनगर समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच बरोबर अहिल्यादेवी यांना मानणाऱ्या जनतेने देखील या गोष्टीचा विरोध केला आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची तुलना राजकारणी महिलेशी करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे असा आरोप सकल धनगर समाजाच्यावतीने करण्यात आला.

संजय राऊत यांनी धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांना लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी नाहीतर लॉकडाउन नंतर महामोर्चासह आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज जिल्हाध्यक्ष अरुण रोडगे यानी दिला आहे.

Leave a Comment