Saturday, March 25, 2023

20 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या Maruti Suzuki Alto कारने मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी Maruti Suzuki च्या लोकप्रिय ऑल्टो Alto कारने विक्रीचा मोठा रेकॉर्ड केला आहे. मारुति सुझुकीने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑल्टोची विक्री 40 लाख यूनिट्सवर गेली असून यासह ऑल्टो भारतात 40 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री करणारी पहिली कार ठरली आहे.

Maruti Suzuki ची ही छोटी कार 20 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. Maruti Suzuki Alto कार 16 वर्षांपासून भारतात टॉप-सेलिंग म्हणजेच सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुति ऑल्टोने 2008 मध्ये 10 लाख यूनिट्स विक्रीचा आकडा पार केला होता. 2012 मध्ये 20 लाख यूनिट्स आणि 2016 मध्ये 30 लाख यूनिट्सपर्यंत विक्री पोहचली होती. मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे या कारने बाजारात आपलं नाव टिकवून ठेवलं आहे.

- Advertisement -

याशिवाय BS6 नॉर्म्स पूर्ण करणारी Maruti Suzuki Alto कार ही देशातील पहिली एन्ट्री लेवल कार ठरली आहे. Maruti Suzuki ने दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतातील 76 टक्के ग्राहक त्यांची पहिली कार म्हणून ऑल्टोची निवड करतात. ऑल्टो भारतीय ग्राहकांच्या पसंतीची कार असून, किंमत परवडणारी असण्याबरोबरच, सोयीस्करही आहे’. Maruti Suzuki Alto पेट्रोलच्या 6 आणि सीएनजीच्या 2 वेरिएन्ट्समध्ये येते. याची एक्स शोरुम किंमत 2.94 लाख ते 4.36 लाखांपर्यंत येते. 800 सीसी इंजिन असणारी ही गाडी BS-6 मानक आणि 3 सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. यात 5 स्पीड मॅन्युअल गियर बॉक्सही आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”