कोविडमधील कर्मचाऱ्यांना आता वसुलीची कामे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना काळात महापालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना 24 केअर सेंटर व इतर ठिकाणी कामाला लावले होते. कोरोना संसर्गाची लाट ओसरली असल्याने कोविड केअर सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे काम देण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरात मोठ्या संख्येने नागरिक बंधित झाले. त्यामुळे महापालिका उपाययोजना करताना नाकीनऊ आले. तब्बल 22 कोविड केअर सेंटर सुरू करावे लागले. त्यासाठी सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. दररोज 10 ते 20 बांधीत आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या केवळ 22 वर आली आहे. परिणामी कोरोना बांधवांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. केवळ मेल्ट्रोन येथील कोविड केअर सेंटर सध्या सुरू आहेत. तिसरी लाट आलीस तर बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले जाणार आहे. त्यामुळे हे कर्मचारी बसून होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता मूळ कामे दिली जाणार आहेत.

Leave a Comment