हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच 1535 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रे अप्रेन्टिस, टेक्निशिअन अप्रेन्टिस किंवा ग्रॅज्युएट अप्रेन्टिस ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीखआहे.
संस्था – इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2022
भरली जाणारी पदे –
ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर – 396 पदे
ट्रेड अप्रेंटिस (फिटर) – 161 पदे
ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) – 54 पदे
तंत्रज्ञ अप्रेंटिस केमिकल – 332 पदे
तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल – 163 पदे (IOCL Recruitment 2022)
तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल – 198 पदे
तंत्रज्ञ अप्रेंटिस इलेक्ट्रिकल -198 पदे
तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन – 74 पदे
ट्रेड अप्रेंटिस- सेक्रेटरीअल असिस्टंट-39 ट्रेड अप्रेंटिस- अकाउंटंट – 45 पदे
ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर – 41 पदे
ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) – 32 पदे
एकूण पद संख्या – 1535 पदे
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main?adv=114 या लिंकवर क्लिक करा.