हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सातारा (Satara) जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेअंतर्गत (Rayat Shikshan Sansthan) एकूण 157 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/समन्वयक, केजी शिक्षक, प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार आणि कौशल्य विषय शिक्षक या पदांचा समावेश आहे.
मुलाखतीची माहिती
या भरतीसाठी मुलाखती 19 जानेवारी 2025 रोजी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा (पिन कोड- 415001) येथे उपस्थित राहावे.
पात्रता
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आला आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर (https://rayatshikshan.edu/) जाऊन जाहिरात वाचावी.
महत्त्वाची माहिती
पदसंख्या: 157
निवड प्रक्रिया: थेट मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख: 19 जानेवारी 2025
ठिकाण: अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा