Saturday, March 25, 2023

10 वी पास असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी!! DRDO मध्ये 1901 जागांसाठी भरती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत तब्बल 1901 जागांसाठी भरती सुरु असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 3 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार तर आहे तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

भरली जाणारी पदे-

1) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B – 1075 पदे
2) तंत्रज्ञ A – 826 पदे

- Advertisement -

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी (Senior Technical Assistant-B) –

1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (DRDO Recruitment 2022)
4. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ ए (Technician-A) –

1. उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल असणं आवश्यक आहे.
4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

1. Resume

2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र

3. शाळा सोडल्याचा दाखला

4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6. पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.drdo.gov.in/careers या लिंकवर क्लिक करा.