हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (ST Corporation) अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल २६३ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. तसेच संपूर्ण माहितीसाठी ही बातमी वाचावी.
भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती
एसटी महामंडळाने ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, १६ ते ३३ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने देखील दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. या भरतीअंतर्गत अर्जाची अंतिम तारीख ३ मार्च २०२५ आहे. इच्छूक उमेदवारांना www.mhrdnts.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.
पात्रता
या भरतीमध्ये विविध तांत्रिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) प्रमाणपत्र घेतलेले असणे आवश्यक आहे.
उपलब्ध पदे आणि शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक मोटर व्हेईकल – मान्यताप्राप्त ITI मधून संबंधित ट्रेड उत्तीर्ण.
ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग/डिप्लोमा – संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण.
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ – ITI मध्ये इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड उत्तीर्ण.
शीट मेटल वर्कर – संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण.
डिझेल मेकॅनिक – मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित अभ्यासक्रम पूर्ण.
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक – संबंधित ट्रेडमधून ITI पूर्ण.
पेंटर आणि वेल्डर – संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र आवश्यक.
अर्ज प्रक्रिया आणि पत्ता
लक्षात घ्या की, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तो आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, जळगाव येथे अर्ज पाठवावा. ज्या उमेदवारांचे अर्ज महामंडळाकडे जमा होते त्यांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत.