हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वे भरतीची (Railway Requirment) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप D च्या 32,438 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र 1 मार्च 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि सविस्तर माहिती वाचून आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे ठेवण्यात आली आहे. काही विशेष प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 जानेवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 1 मार्च 2025
फी भरण्याची अंतिम तारीख – 3 मार्च 2025
अर्जात सुधारणा करण्यासाठी कालावधी – 4 मार्च ते 13 मार्च 2025
परीक्षेची तारीख: अद्याप जाहीर नाही
निवड झाल्यास किती पगार मिळेल?
ग्रुप D पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- पगार देण्यात येईल. यासोबतच, इतर भत्तेही लागू होतील.
अर्ज शुल्क किती?
सामान्य (UR), OBC आणि EWS उमेदवारांसाठी: 500 रूपये
SC, ST, दिव्यांग आणि EBC उमेदवारांसाठी: रूपये 250
अर्ज कसा करावा?
- प्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइटवर (www.rrbapply.gov.in) जा.
- नवीन उमेदवारांनी “Create an Account” या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करावी.
- ईमेल आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर आधार पडताळणी होईल.
- नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म भरा.
- पुढे फोटो आणि सही योग्यरित्या अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट काढा.