नोकरीची सुवर्णसंधी!! राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या उमेदवारांचे शिक्षण कमी झालं आहे म्हणजे 7 वी किंवा 10 वी पर्यंतच ज्यांना शिक्षण घेता आलं आहे अशा उमेदवारांना सुद्धा नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान- नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.

पद संख्या – 512 पदे

भरली जाणारी पदे – (Job Alert)
1. लघुलेखक (निम्नश्रेणी)
2. लघुटंकलेखक
3. जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क)
4. चपराशी (गट ड)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. लघुलेखक (निम्नश्रेणी) – उमेदवार 10 वी पास असावा, लघुलेखन 120 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
2. लघु टंकलेखक – उमेदवार 10 वी पास असावा, लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
3. जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) – उमेदवार 7 वी पास असावा,
4. चपराशी (गट ड) – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा

मिळणारे वेतन –

1. लघुलेखक (निम्नश्रेणी)- 41,800 – 1,32,300 रुपये दरमहा
2. लघुटंकलेखक- 25,500 – 81,100 रुपये दरमहा
3. जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क)- 21,700 – 69,100 रुपये दरमहा
4. चपराशी (गट ड)- 15,000 – 47,600 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

1. Resume (बायोडेटा)
2. शैक्षणिक प्रमाणपत्रं (Job Alert)
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY