हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) विविध विभागांमध्ये 620 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या ठिकाणी नोकरी करायची आहे त्यांनी त्वरित आपले अर्ज दिलेल्या तारखेच्या दाखल करावेत. तसेच अधिक माहितीसाठी ही संपूर्ण बातमी वाचावी.
विभाग व पदसंख्या
या भरतीअंतर्गत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य आणि इतर विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील पदे समाविष्ट आहेत.
पद आणि वेतनश्रेणी
बायोमेडिकल इंजिनियर: 41,800 – 1,32,300
ज्युनिअर सिव्हिल इंजिनियर, ज्युनियर बायोमेडिकल इंजिनियर, उद्यान प्रशिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक: 38,600 – 1,28,000
डेंटल हायजिनिस्ट, नेत्रचिकित्सा सहाय्यक: 35,400 – 1,12,400
स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, ईसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ: 29,200 – 92,300
उमेदवारांनी लक्षात घ्या की, या भरतीअंतर्गत आरोग्य सहाय्यक (महिला), औषध निर्माण अधिकारी, उद्यान सहाय्यक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस आदी पदे देखील भरली जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया व परीक्षा पद्धती
नवी मुंबई महानगरपालिकेने अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन ठेवली आहे. यासाठी उमेदवारांना 28 मार्च 2025 पासून अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट www.nmmc.gov.in वर जाऊन अर्ज आपला अर्ज भरावा. महत्वाचे म्हणजे, या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे.
अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्ग – 1,000
राखीव प्रवर्ग – 900
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025