हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महावितरण (Mahavitaran Job) विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती तब्बल 800 रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. यामध्ये, कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता अशा रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. गेल्या 1 मार्चपासून पदांच्या भरतीचे अर्ज सुटले आहेत. आता 19 एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे कोणतीही वेळ वाया न घालवता इच्छुक तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. तसेच सविस्तर माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचावी.
कोणती पदे भरली जाणार?
महावितरणाच्या कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता विभागांसाठी 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी मुळ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा किती?
कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता 30 वर्षे
पदवीधर अभियंता – 35 वर्षे
कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे
पदवीधर अभियंता – 35 वर्षे
अर्ज शुल्क
या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024 आहे. अर्ज करताना ओपन कॅटेगरी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासह SC , ST अशा इतर उमेदवारांना 250+ जीएसटी शुल्क भरावे लागणार आहे.
अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या वेबसाईटला भेट द्यावी. या वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटवर देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात पहावी. या जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल आहे.