हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वे विभागात (Indian Railway) तब्बल 9 हजार 114 पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये, टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलसाठी 1092 पदे आणि टेक्निशियन ग्रेड-III सिग्नलसाठी 8052 पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातच भारतीय रेल्वेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज नेमका कुठे करायचा कसा करायचा याविषयीची माहिती जाणून घ्या. (Job Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत
9 हजार 114 रिक्त पदांच्या भरतीसाठी भारतीय रेल्वे भर्ती बोर्डाने आधी सूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक तरुणांना
https://www.rrbapply.gov.in/#/auth/ वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे.
वयोमर्यादा अट
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 36 दरम्यान असावे. तसेच, अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि ITI पदवीधारक असावा.
पगार किती असेल?
टेक्निशियन ग्रेड-I ला लेव्हल -5 संबंधित पदासाठी 29,200 पगार मिळेल. तसेच, टेक्निशियन ग्रेड-III च्या पदासाठी 19,900 पगार मिळेल.
वयाची सवलत
एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट असेल. एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना 3 ते 8 वर्षांची सूट असेल. अपंग उमेदवारांना 8 ते 15 वर्षांची सूट असेल.
भरतीसाठी अर्ज शुल्क
अर्ज करताना एससी/एसटी, एक्स सर्व्हिसमन, आर्थिकदृष्ट्या मागास, अल्पसंख्याक, महिला ट्रान्सजेंडर यांच्यासाठी अर्ज शुल्क 250 रूपये असेल. यासह हे तर उमेदवारांकडून अर्जासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल.
अर्ज कोठे करावा?
https://www.rrbapply.gov.in/#/auth/ या लिंकवर जाऊन अर्ज करावा.