मुंबई उच्च न्यायालयात या रिक्त पदासाठी भरती होणार; अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| न्यायालयामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत (Mumbai High Court) विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्हाला देखील उच्च न्यायालयात नोकरी करायचे असेल तर त्वरित या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. कशाची भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या पदासाठी करण्यात येत आहे?? भरतीचा अर्ज भरावा कसा लागेल?? रिक्त जागा किती असतील?? याविषयी सविस्तर माहिती.

कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू??

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाअंतर्गत ही भरती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदासाठी होणार आहे. याअंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. यासाठी मात्र उमेदवारांकडून मागवले जात आहेत. हे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सादर करता येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता काय हवी??

पदासाठी अर्ज उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दिलेल्या जाहिरातीत वाचावी.

अर्ज पद्धत कोणती??

या भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येत आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता??

ऑफलाइन अर्ज करताना तो रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज सादर करताना [email protected] या ई-मेलवर पाठवावा.

अर्जाची शेवटची तारीख??

22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.