Job Requirements| बँकेत नोकरी करू इच्छेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank Of India) नुकतीच भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्यात अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. आता या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. गेल्या 15 मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक तरुण येत्या 31 मे पर्यंतच रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुकांनी अजिबात वेळ न वाया घालवता त्वरित भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. तसेच याविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी.
पदाचे नाव – सल्लागार (निवृत्त अधिकारी)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्जाची अंतिम तारीख – 31 मे 2024
वयाची मर्यादा – 65 वयोवर्षे
अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, एचसीएम विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सतरावा मजला, मध्यवर्ती कार्यालय, नरिमन पॉइंट, मुंबई
अधिकृत संकेतस्थळ – https://www.centralbankofindia.co.in/
अर्ज कसा करावा??
- सर्वात प्रथम इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदासाठी अर्ज तयार करावा.
- या अर्थासहित आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावीत.
- त्यानंतर हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावा.
- पुढे हा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला बँकेकडून संपर्क साधला जाईल.