स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! एकूण 269 रिक्त पदांसाठी भरती जाहीर

0
28
State Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचून लवकरात लवकर आपल्या अर्ज दाखल करावेत. या भरती अंतर्गत एकूण २६९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २१ मार्च २०२५ आहे.

कोणती पदे भरली जाणार?

स्टेट बँकेत FLC काउंसलर आणि FLC डायरेक्टर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. बँकेकडून एकूण २६९ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२५ आहे.

भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती

ही भरती परीक्षा न घेता शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्याची गरज नाही. फक्त मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे.

पदांनुसार वेतन

स्टेट बँकेच्या या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी मिळणार आहे. पदांनुसार वेतन पुढीलप्रमाणे असेल –

क्लेरिकल पद: ३०,०००/- प्रति महिना

JMGS I: ४०,०००/- प्रति महिना

MMGS II: ४५,०००/- प्रति महिना

MMGS III: ४५,०००/- प्रति महिना

MMGS IV: ५०,०००/- प्रति महिना

अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत माहिती

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरती अधिसूचना (notification) काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता येईल.

दरम्यान, स्टेट बँक नेहमी विविध पदांसाठी भरती जाहीर करत असते. आता पुन्हा एकदा बँकेकडून भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न लावता, पात्रता निकष तपासून अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अर्ज करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी.