आरोग्य विभागातील 329 रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात

औरंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची 365 पदांसाठी 18 संवर्गाच्या भरती ची जाहिरात एक मार्च 2019 रोजी काढण्यात आली होती पण कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भावामुळे रखडलेल्या भरतीला आता सुरुवात झाली आहे. पाच संवर्गातील पदे 100% भरण्याला मंजुरी मिळाल्याने आता 265 पदांची जाहिरात 29 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती जिल्हा व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी शनिवारी दिली. आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आदी पाच संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण रद्द ठेवल्याने एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना फुले किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येईल यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी 1 ते 21 जुलै 2021 पर्यंत डब्ल्यूडब्ल्यू. महाआरडीझेड पी. इन या संकेतस्थळावर लॉग इन करून विकल्प द्यायचा आहे. एकदा दिलेल्या विकल्प बदल करता येणार नाही. तसेच ईडब्ल्यूएस जा विकल्प देणाऱ्यांना परीक्षेपूर्वी सक्षम अधिकार्‍याचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक केले आहे.

ग्रामविकास विभागाकडून भरती
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे म्हणाले आता ही भरती ग्रामविकास विभागामार्फत होणार आहे एसीबीसी ची पदे खुली करण्यात आली असून त्यांना अधिक दुर्बल घटक किंवा खुल्या प्रवर्गाचा (ईडबल्यूएस)उमेदवारांना निवडून लेखी परीक्षा देता येणार आहे.