हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न वाया घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावा. महत्वाचे म्हणजे हा अर्ज बारावी पास असलेल्या उमेदवारांनाही करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे ही भरती नेमकी कोठे निघाली आहे?? त्यासाठी अर्ज कसा भरायचा?? वयोमर्यादा काय असेल?? पगार किती दिला जाईल?? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. (Job Requirement)
मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकर भरती भारतीय नौदलाकडून (Indian Navy) राबवली जात आहे. भारतीय नौदल अग्नीवीर पदासाठी ओके उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदावर काम करू इच्छित आहेत त्यांनी agniveernavy.cdac.in या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेचा अर्ज भरा. तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी agniveernavy.cdac.in या वेबसाईटला भेट द्यावी.
लक्षात ठेवा की ही अर्ज प्रक्रिया 13 मे 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेकडून गणित आणि भौतिकशास्त्र विषयात 50 टक्के गुणांसह बारावी पास असायला हवा. तसेच त्याच्याकडे नौदलाविषयी ज्ञान असायला हवे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग केले जाईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.
महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 550 रुपये फी भरावी लागेल. ही फी त्यांना अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने जमा करावी लागेल. हा अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना पुढील प्रक्रिया ईमेलच्या माध्यमातून कळवली जाईल. खास म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास उमेदवारांनाही अर्ज करता येत आहे. सध्या मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबतची माहिती ruhsraj.org या साईटवर पाहू शकता.