हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Redmi चे स्मार्टफोन बाजारात चांगलेच प्रसिद्ध आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत रेडमीचा मोबाईल स्वस्त आणि खिशाला परवडणारा असल्याने रेडमीचा ग्राहकवर्ग सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आताही कंपनीने गरिबाला परवडेल अशा किमतीत एक नवीन मोबाईल मार्केटमध्ये आणला आहे. Redmi A3x असे या मोबाईलचे नाव असून सध्या हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आलाय. आज आपण रेडमीच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात …..
6.71 इंचाचा डिस्प्ले –
Redmi A3x मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.71 इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल वापरत असताना या डिस्प्लेचा डोळ्यांवर कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून यामध्ये DC डिमिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे सिक्युरिटी साठी स्मार्टफोनच्या पुढील आणि मागील बाजूला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये Unisoc T603 प्रोसेसर बसवला असून Android 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल काम करतो.
कॅमेरा – Redmi A3x
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi A3x मध्ये 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 3 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मिळतेय. अन्य फीचर्स बाबत बोलायचं झाल्यास, यामध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरयांसारखी वैशिष्टये मिळतात.
किंमत किती?
Redmi A3x स्मार्टफोन 3GB RAM + 64GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. या मोबाईलची किंमत 18,999 PKR (भारतीय चलनानुसार अंदाजे 5,500 रुपये) आहे. रेडमीचा हा मोबाईल लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा मोबाईल ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि मूनलाईट व्हाइट रंगांमध्ये खरेदी करता येईल.