Redmi K70 Ultra : 24GB रॅमसह Redmi ने लाँच केला K70 Ultra; किंमत किती पहा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने आपला नवीन स्मार्टफोन Redmi K70 Ultra लॉन्च केला आहे. दिसायला हा मोबाईल अतिशय आकर्षक तर आहेच याशिवाय या स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स सुद्धा देण्यात आली आहेत. 24GB RAM, 50MP कॅमेरा, 5500mAh बॅटरी सारख्या फीचर्सने हा मोबाईल सुसज्ज आहे. कंपनीने हा स्मार्टफोन एकूण ५ व्हॅरियंट मध्ये लाँच केला असून त्यानुसार त्याच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आज आपण रेडमीच्या या मोबाईलचे सर्व डिटेल्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊयात…..

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Redmi K70 Ultra मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 144Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. कंपनीने स्क्रिनला Xiaomi Shield Glass चे प्रोटेक्शन दिले आहे. Redmi K70 Ultra मध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. कंपनीने हा स्मार्टफोन एकूण पाच व्हेरिएन्टमध्ये लॉन्च केला आहे.

कॅमेरा – Redmi K70 Ultra

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi K70 Ultra मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि वव्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 20MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 120W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Redmi K70 Ultra च्या 24GB RAM + 1TB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 3999 युआन (जवळपास 46 हजार रुपये) आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2599 युआन (अंदाजे 29,900 रुपये) आहे. हा स्मार्टफोन काळया, पांढऱ्या आणि निळ्या रंगात लाँच करण्यात आला आहे. सध्या या मोबाईलचे लौंचिंग चीनमध्ये करण्यात आलं असून येत्या काळात लवकरच तो भारतात सुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.