Redmi Note 12 5G सिरीज 5 जानेवारीला लॉन्च होणार; किंमत किती?

redmi-note-12-series-cover-
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi Note सिरीज ने (Redmi Note 12 5G) जागतिक स्तरावर 300 दशलक्षचा टप्पा ओलांडल्याचे Xiaomi India ने अलीकडेच जाहीर केलं होत. त्यातच आता कंपनी 5 जानेवारी 2023 रोजी Note 12 5G सिरीज लॉन्च करणार आहे. याअंतर्गत कंपनी Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G, आणि Redmi Note 12 Pro+ 5G हे ३ मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. चला आज आपण जाणून घेऊयात या तिन्ही मोबाईलचे फीचर्स आणि त्यांच्या किमतींबाबत..

Redmi Note 12 5G

1) Redmi Note 12 5G : (Redmi Note 12 5G)

Redmi Note 12 5G मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. यामध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरल 1 चिपसेट देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये 48MP चा प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. (Redmi Note 12 5G) याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी मोबाईलला 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमीच्या या मोबाइलला 5000mAh ची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. या डिव्हाइसला 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज असून या मोबाईलची किंमत २० हजार रुपयांच्या आत आहे.

Redmi Note 12 Pro 5G

2) Redmi Note 12 Pro 5G –

Redmi Note 12 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे . प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट असेल. या मोबाइलला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे.

https://www.instagram.com/reel/CmQugjcguXI/?utm_source=ig_web_copy_link

याशिवाय Redmi Note 12 Pro 5G मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाइसला 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज मिळू शकते. या मोबाईलची किंमत 25 हजारांच्या आसपास असू शकते.

Redmi Note 12 Pro+ 5G

3) Redmi Note 12 Pro+ 5G :

Redmi Note 12 Pro+ मध्ये 6.67-इंचाचा 10-बिट AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असून यामध्ये 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. Redmi Note 12 Pro+ 5G मध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर आहे. या मोबाइलला 120W हायपरचार्ज सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सेल Samsung HPX रियर कॅमेरा लेन्स दिला जाईल. यासोबतच मोबाइलला मध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल.

https://www.instagram.com/reel/Cmqd66ZAEFZ/?utm_source=ig_web_copy_link

याशिवाय (Redmi Note 12 5G) सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाईल मध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल. या डिव्हाइसला 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज मिळू शकते. या मोबाईलची किंमत 30 हजारांच्या आसपास असू शकते.

Redmi च्या note 12 सिरीज मधील हे मोबाईल तुम्ही Amazon वरूनही खरेदी करू शकता. Amazon वरून हा मोबाईल खरेदी करण्यासाठी इथे Click करा.