Redmi Note 13R मोबाईल 12GB RAM, 50MP कॅमेरासह लाँच; पहा किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Redmi ने जागतिक बाजारात Redmi Note 13R नावाचा नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये आणि 5 कॉन्फिगरेशन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.यामध्ये 12GB RAM, 50MP कॅमेरा आणि 5030mAh बॅटरी देण्यात आली आहे. सध्या या मोबाईलचे लौंचिंग चीनमध्ये करण्यात आलं असून भारतात सुद्धा तो लवकरच दाखल होईल असं बोललं जातंय. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.79-इंचाचा डिस्प्ले-

Redmi Note 13R मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये न Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर बसवण्यात आला असून यामध्ये 6GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असे पर्याय देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज नुसार मोबाईलची किंमत सुद्धा वेगळी आहे.

कॅमेरा – Redmi Note 13R

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 13R मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 2MP दुय्यम लेन्स उपलब्ध आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आलाय. पॉवरसाठी रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये 5030mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

किंमत किती?

Redmi Note 13R च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1399 युआन (अंदाजे 16 हजार रुपये) आहे. तर 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत १५९९ युआन (अंदाजे १९ हजार रुपये), 8GB RAM + 256GB स्टोरेज मोबाईल ची किंमत १७९९ युआन (अंदाजे २१ हजार रुपये), 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत १९९९ युआन (अंदाजे २३ हजार रुपये) आणि टॉप व्हेरियन्ट असलेल्या 12GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2199 युआन (अंदाजे 25 हजार रुपये ) आहे.