हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Redmi ब्रँडने भारतीय बाजारात अनेक वर्षवर्षांपासून लोकप्रियता मिळवली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध असल्याने रेडमीच्या मोबाईलला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. वाढती मागणी पाहता कंपनी सुद्धा सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असेल स्मार्टफोन बाजारात आणत असते. आताही रेडमीने आपला Redmi Note 14 5G नावाचा मोबाईल जागतिक बाजारात लाँच केला आहे. 12GB RAM आणि 50MP कॅमेरा यासारखे अनेक दमदार फीचर्स या स्मार्टफोन मध्ये देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे मोबाईलची किंमतही सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. आज आपण रेडमीच्या या नव्या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…..
Redmi Note 14 5G चे नवीन फीचर्स –
Redmi Note 14 5G मध्ये 6.67 इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे , जो 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आणि 100 निट्स की पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या मध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर बसवला आहे ज्यामुळे याची कार्यक्षमता जास्त चांगली झाली आहे. रेडमीचा हा मोबाईल एंड्रॉयड 14 वर आधारित Xiaomi HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 12GB + 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 14 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा असून 2MP डेप्थ सेन्सर वापरण्यात आला आहे.सेल्फीसाठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5,110mAh ची बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45W चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी बदल सांगायच झाल तर या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, आणि Bluetooth 5.3 उपलब्ध आहे.
किंमत-
चीनमध्ये Redmi Note 14 5G च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 1199 युआन (अंदाजे 14,300 रुपये) आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 1,399 युआन (अंदाजे 16,700 रुपये) आहे. 8GB + 256GB मॉडेलची किंमत 1,499 युआन (अंदाजे रु. 17,900) आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 1,699 युआन (अंदाजे रु. 20,300) आहे.