तुमच्याही फ्रिजरमध्ये खूप जास्त बर्फ साठतो का? डी-फ्रिज न करता वापरा ही पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंमध्ये अनेक लोकांना त्यांच्या फ्रीझरमध्ये बर्फ गोठण्याची समस्या जाणवते. या साठलेल्या बर्फामुळे वस्तू ठेवण्यास अडचण निर्माण होतात. त्यामुळे शिल्लक राहिलेलं अन्न कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण होतो. कित्येकदा ताजे अन्न खराब होते. त्यामुळे अन्नाची सुरक्षितता कमी झाल्याचे दिसून येते. बर्फ साठल्यामुळे तो वितळण्यास खूप वेळ लागतो. हि प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे अनेक पदार्थ खराब होतात. काही लोक लगेच सर्व्हिस सेंटरमध्ये फ्रिज घेऊन जातात, पण आता याची गरज नाही. घरगुती उपाय करून तुम्ही हि समस्या सोडवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकाल.

बर्फ वितळवण्यासाठी काही पद्धती

गरम पाण्याचा वापर

फ्रीझरमधील बर्फ काढण्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे गरम पाण्याचा वापर करणे. तुम्ही फ्रीझर बंद करून त्याला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, जिथे पाण्याने काहीही नुकसान होणार नाही. नंतर एक बादली गरम पाण्याने भरून घ्यावी, हळूहळू ते फ्रीझरमध्ये ओता. या गरम पाण्याच्या पद्धतीमुळे बर्फ वितळण्यास मदत होईल, तसेच या पद्धतीने बर्फ कमी वेळेत निघू शकतो.

उकळत्या पाण्याचे भांडे

दुसरी पद्धत म्हणजे उकळलेल्या पाण्याने भरलेले भांडे घेऊन ते काळजीपूर्वक फ्रीझरमध्ये ठेवा. भांड्याच्या गरम वाफेमुळे बर्फ त्वरित वितळण्यास सुरुवात होईल. यामुळे बर्फ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.

हेअर ड्रायरचा वापर

जर तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल, तर तुम्ही त्याचा वापर करून बर्फ वितळवू शकता. फ्रीझरचा दरवाजा उघडून, हेअर ड्रायर चालू करा आणि गरम हवेने फ्रीझरच्या आतील बाजूस धरा . गरम हवेमुळे बर्फ वितळण्यास मदत होईल , ज्यामुळे तुम्हाला झटपट परिणाम मिळतील.

सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावे

बर्फ काढताना धातूच्या चमच्यांचा वापर टाळा. धातूचा वापर फ्रीझरच्या आतील भागाला नुकसान पोचवू शकतो. त्याऐवजी, प्लास्टिकच्या चमच्याचा वापर करा, जो सुरक्षित आणि प्रभावी आहे. जर तुम्हाला वारंवार फ्रीझरमध्ये बर्फ गोठण्याची समस्या येत असेल, तर फ्रिज सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावे. ज्यामुळे तुमच्या समस्या सोडवण्यात मदत मिळेल. या सर्व उपायामुळे तुम्ही फ्रीझरची कार्यक्षमता वाढवू शकता.