उड्डाणे रद्द झालेल्या विमानाच्या प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत द्या – पृथ्वीराज चव्हाण  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

जगभरात कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. साधारण मार्चपासून जगभर कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. जगभरातील साधारण ४.५ दशलक्ष विमानाची उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली. भारतातील काही प्रवाशांनी ही उड्डाणे रद्द झाल्यावर आपल्या तिकीट बुकिंग चे पैसे पार्ट मिळावेत म्हणून मागणी केली असता. विमान कंपन्यांनी अप्रत्यक्षरीत्या पैसे परत देण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री हरदीप सूरी यांना या प्रवाशांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी करणारे पत्र लिहिले असून तसे ट्विट देखील केले आहे.

प्रवाशांनी आपल्या तिकिटाचे पैसे परत मागितले असता, कंपन्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला असून भविष्यकाळात प्रवासासाठी व्हाउचर देऊ केले आहेत. अनेक ग्राहकांना हे व्हाउचर नको आहेत तर अशा ग्राहकांना ते घेण्यास सांगितले जात आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक आणि विमान कंपनी यांना त्यांचे पैसे मागण्याचा अधिकार आहे. मात्र एअर इंडिया सहित अनेक विमान कंपन्या ग्राहकांना जबरदस्ती हे व्हाउचर देत आहेत. काही कंपन्या तर पैसे परत मिळण्याच्या धोरणाची चुकीची माहिती देत आहेत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रात म्हंटले आहे. या विषयात मुंबईतील ग्राहक कायद्याची एक संस्था मुंबई ग्राहक पंचायत यांनी युनायटेड नेशन्स गाईडलाईन फॉर कन्झ्युमर प्रोटेक्शन यांच्याकडून मध्यस्थी केली आहे.

 

चव्हाण यांनी हरदीप सूरी यांना पैसे परत मिळण्याच्या धोरणावर तसेच थेट विमान कंपन्यांनी ग्राहकांवर केलेल्या या अन्यायावर स्पष्टीकरण देण्याची विनंती केली आहे. तसेच रोख पैसे परत करण्याची सोया करण्याची देखील विनंती केली असून त्यांनी पैसे परत मिळण्याचा एक ठराविक कालावधी ठरवून त्या मुदतीत ग्राहकांचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. दरम्यान देशातील विमानसेवा सुरु झाली असली तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा अद्याप सुरु झालेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment