औरंगाबाद | जिल्ह्यातील लॉकडाऊन हा जनतेच्या हितासाठी लागू करण्यात आला असून, लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतर गरजू नागरिकांच्या जेवणाच्या डब्याची सोयसुद्धा प्रशासनाने केली आहे. परंतु जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाला लोक प्रतिनिधींनी विरोध करणे म्हणजे कायद्याचा भंग असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची लॉकडाऊनसंदर्भात मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी शहरामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला कडाडून विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने मोर्चाला विरोधही दर्शवला असला व पोलीस परवानगी जरी दिली नसली तरी उद्याचा मोर्चा काढणार असल्याच्या मत खासदार जलील यांनी यावेळी सांगितले.
शहरांमध्ये लॉकडाऊन करून काहीच अर्थ नाही. प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर व शहरांमध्ये जमावबंदी आदेश लागू असताना फिरणाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदाच्या जागा त्वरित भरण्याची मागणी आमदार अतुल सावे यांनी केली. यावेळी त्यांनी दहा दिवसांचा लागण्याऐवजी सात दिवसांच्या लॉकडाऊनबाबत विचार करावा, असे सांगितले. जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाला लोक प्रतिनिधींनी विरोध करणे, म्हणजे कायद्याचा भंग असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group