औरंगाबाद | 10 ऑक्टोंबर रोजी राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर तीन ऑगस्ट पासून या परीक्षेसाठी टीईटी टीचर एलीजीबीलिटी टेस्ट म्हणजेच टीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु होणार आहे.
यंदा टीईटी या परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहे. आता पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेत करण्यात आलेल्या बदलांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एक समिती नियुक्त केली होती. आता इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन परीक्षामंडळे सर्व माध्यमे अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.
या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 3 ते 25 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्यात येणार असून 25 ते 10 ऑक्टोंबर पर्यंत प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट घेता येईल. त्याचबरोबर पहिला पेपर 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत असेल तर दुसरा पेपर त्याचदिवशी 2 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत राहणार आहे.




