Wednesday, March 29, 2023

जिओचं नवीन टॉप-अप रिचार्ज; केवळ १० रुपयात मिळणार १ जीबी डेटा आणि कॉलिंग

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र । रिलायन्स जिओनं मागील वर्षी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल करत प्लानच्या किंमतीत वाढ केली होती. सोबतच जिओमधून अन्य नेटवर्कवरील अनलिमिटेड कॉलिंग बंद केली. ह्या सुविधा बंद केल्यानंतर आता अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्सची आवश्यकता भासते. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता अशा ग्राहकांना जिओने खास ऑफर दिली आहे.

या ऑफरनुसार नॉन जिओ मिनिट्ससाठी ग्राहकांना केवळ १० रुपयांचा टॉप अप रिचार्ज करावा लागणार. यात ग्राहकांना १ जीबीचा मोफत डेटा आणि नॉन जिओ कॉलिंग मिनिट्सचा लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओने IUC चार्ज आकारण्या सुरुवात केली होती. त्यामुळे अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट आकारणी होऊ लागली होती. या निर्णयामुळे अनेक ग्राहक नाराज झाले होते. त्यानंतर ग्राहकांसाठी जिओने प्रीपेड प्लानसह नॉन जिओ मिनिट्स देण्यास सुरुवात केली. जवळपास सगळ्याच प्रीपेड प्लानमध्ये जिओकडून नॉन जिओ मिनिट्स देण्यात येतात.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले गोत्यात

‘उबर इट्स’ला ‘झोमॅटो’नं घेतलं विकत; तब्बल २४८५ कोटी रुपयांना झाला व्यवहार

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान