IPO : लवकरच येणार Reliance Jio चा IPO, मुकेश अंबानी AGM मध्ये करू शकतील घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुकेश अंबानी आपल्या ग्रुप मधील दोन महत्त्वाच्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट करू शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडियरी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा IPO येऊ शकेल.

रिलायन्स ग्रुपच्या या दोन कंपन्यांचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा IPO लवकरच लॉन्च होणार्‍या LIC च्या IPO (सुमारे 21,000 कोटी) पेक्षा मोठा असेल. एका बातमीनुसार, रिलायन्स जिओ 50,000 कोटी रुपये तर रिलायन्स रिटेलचा IPO 75,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकेल.

या दोन कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग करण्याचा विचार रिलायन्स ग्रुप करत असल्याचे एका बातमीत म्हटले गेले आहे. मुकेश अंबानी स्वतः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याबाबतची घोषणा करू शकतात. इतकेच नाही तर जगातील मोठया टेक कंपन्यांसाठी सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या अमेरिकेच्या Nasdaq मध्ये देखील रिलायन्स जिओला लिस्ट केले जाऊ शकते.

मात्र रिलायन्स सर्वांत आधी रिलायन्स रिटेलचा IPO बाजारात आणू शकते. त्यानंतर रिलायन्स जिओला शेअर बाजारात लिस्ट करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. रिलायन्स डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची शक्यता आहे.

Paytm ने आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा IPO लाँच केला होता. Paytm ने 2021 मध्ये 18,300 कोटी रुपये जमा केले. याआधी 2010 मध्ये कोल इंडियाने 15,000 कोटी रुपयांचा दुसरा मोठा IPO लॉन्च केला होता. तर 2008 मध्ये तिसरा सर्वात मोठा IPO रिलायन्स पॉवरने लाँच केला होता, जो 11,700 कोटी रुपयांचा होता.