नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने बुधवारी सांगितले की,”सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे 2020-21 साठी रिटर्न भरताना करदात्यांकडून आकारले जाणारे व्याज आणि लेट फीस परत केली जाईल.”
साथीच्या काळात करदात्यांना अनुपालनाशी संबंधित दिलासा देण्यासाठी, मागील आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि, काही करदात्यांनी तक्रार केली की,’31 जुलै 2021 नंतर भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न वर त्यांच्याकडून व्याज आणि लेट फीस आकारली गेली.’
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर लिहिले आहे की, ‘इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलम 234 F अंतर्गत लेट फीस आणि कलम 234 A अंतर्गत व्याजाच्या चुकीच्या गणनेशी संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी ITR सॉफ्टवेअर दुरुस्त करण्यात आले आहे.’
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने लिहिले आहे, “करदात्यांना ITR सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती किंवा ऑनलाइन फाईल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जर कोणत्याही प्रकारे, ITR आधीच अशा चुकीच्या व्याजासह किंवा लेट फीस जमा केली गेली असेल तर ते योग्यरित्या मोजले जाईल. CPC-ITR वर प्रक्रिया करताना आणि भरलेली जास्तीची रक्कम, जर असेल तर परत केली जाईल. ”