कंबरदुखीने त्रस्त आहात ?? ; ‘या’ पाच गोष्टीचे करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशभरात कोरोनाचे संकट पसरले आहे. त्यामुळे शक्यतो सगळे जण घरूनच काम करत आहेत. त्यामुळे पाठीचे दुखणे क्रित्येक लोकांना सुरु झाले आहे. पाठीच्या दुखण्यापासून आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आहारात काही प्रमाणात बदल करायला पाहिजेत, जेव्हा कंबर दुखते त्या वेळी खूप त्रास व्हायला सुरुवात होते. उठणे , बसने , झोपणे अश्या साध्या साध्या गोष्टी करणे सुद्धा फार त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी आपण घरगुती कोणते उपाय केले जाऊ शकतात याची माहिती घेऊया .

आले —
आले हे सगळ्या आजरांवर लाभकारक उपाय आहे. आले हे आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त आजारांवर उपयोगी ठरत आहे. सर्दी , खोकला, पचन यासारख्या आजरांबरोबर कंबर दुखीचा आजराला सुद्धा मदत करण्याचे काम आले करते. त्यासाठी आल्याचा काढा तयार करा. एक ते दोन कप पाणी उकळवा, त्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात आले टाका. मंद आचेवर हे पाणी उकळू द्या त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि थोडे थोडे पाणी पिण्यास सुरुवात करा. सर्दी, खोकला, ताप या आजारानाबरोबर कंबर दुखीचा आजार सुद्धा कमी होऊ शकतो.

लसूण —

आपल्या आहारात लसूण हा जास्त उपयोगी आहे. जर लसूण याच्या दोन ते तीन पाकळ्या जर तेलात टाकून त्याचे मालिश केले तर आपल्या कंबरेला चागल्या प्रकारे अराम मिळू शकतो. आहारात सुद्धा लसणाच्या कुड्यांचा वापर जास्त फायदेशीर ठरू शकतो.

हळद —

आपल्या स्वयंपाक घरात हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हळदीचा वापर आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यसाठी सुद्धा केला जातो. मध्ये काही प्रमाणात दूध उकळलेले घ्या . त्याच्यामध्ये काही प्रमाणात हळद टाका आणि ते दूध पिऊन घ्या . त्यामुळे पाठीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

मेथीचे दाणे —
एक ग्लास दुधामध्ये काही प्रमाणात मेथीच्या दाण्यांची पूड तयार करा. आणि दुधामध्ये ती पूड टाकून त्यामध्ये काही प्रमाणात मध टाकून ते पिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सुद्धा कंबरेला आराम मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment