LPG सिलेंडर विकत घेण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी! नाहीतर होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एलपीजी सिलेंडर हा सामान्य व्यक्तीच्या दैनंदीन जीवनातील एक अविभाज्य घटक. बहुतांशी लोक घरामध्ये 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर वापरतात. पण हाच एलपीजी सिलेंडर घेताना अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. गॅस सिलेंडर विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

एलपीजी सिलेंडर मधील गॅसचे वजन 14.2 किलो असते. उरलेल्या सिलेंडरचे वजन 15 ते 17 किलो पर्यंत असते. हे वजन स्पष्टपणे सिलेंडरच्या टाकीवरती लिहिलेलं असतं. जर सिलेंडरचे वजन हे 15.8 किलोग्राम असेल, आणि त्यामध्ये 14.2 किलो गॅस असेल तर एकूण वजन हे तीस किलोग्राम असेल. पण बऱ्याच वेळा हे वजन चेक केल जात नाही. विक्रेते हे गॅस सिलेंडर विकण्यासाठी अनेक वेगवेगळ्या कंपन्यांकडे फ्रॅंचाईजी घेतात. अनेक वेळा त्यामार्फत फसवणूकही होते. त्यामुळे थेट विक्रेत्यांकडून गॅस सिलेंडर खरेदी करणे ग्राहकांसाठी चांगले आहे. गॅस सिलेंडर खरेदी करताना त्याचं वजन करून पाहायला विसरू नका. त्याने फसवणुकीचा धोका कमी होऊ शकेल.

घरगुती वापराकरता सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित गॅस सिलेंडरसाठी आता जवळपास 769 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 14.2 किलो सिलेंडर गॅसची किंमत 719 रुपये इतकी होती. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. यापूर्वीही दोन डिसेंबरला आणि 15 डिसेंबरला प्रत्येकी पन्नास रुपयांनी गॅस सिलेंडर मागे वाढ केली होती. गॅस सिलेंडरच्या गॅस किमती जाणून घ्यायच्या असतील तर https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन गॅसच्या किमती बाबत माहिती जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like