रेणु शर्मा मलाही एका रुममध्ये घेऊन गेली होती; मनसे नेत्याचा धक्कादायक खुलासा

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा यांच्यावर आता विविध राजकिय नेत्यांकडून हनीट्रेपचा आरोप केला जात आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी शर्मा या आपल्याला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा खुलासा केला आहे. यानंतर आता मनसे नेते मनीष धुरी यांनीही सदर महिला आपल्यालाही संपर्कात होती असा गोप्यस्फोट केला आहे. रेणु शर्मा मलाही एका रुममध्ये घेऊन गेली होती मात्र मी कोणत्याही मोहाला बळी पडलो नाही असा खुलासा धुरी यांनी केला आहे.

मनीष धुरी म्हणाले , २००८-९ च्या सालात रेणू शर्मा या महिलेने माझा नंबर मिळवून माझ्याशी संपर्क केला. नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षाचा विभाग अध्यक्ष असल्याने नागरिक संपर्क करतात असा माझा समज होता. मात्र, या महिलेने माझ्याशी चुकीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’

‘माझ्याशी जवळीक साधून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या महिलेने केला. गाण्याचा व्हिडीओ अल्बम बनवण्यासाठी अशाच मोठमोठ्या लोकांना हेरत होती. मी वेळीच सावध झालो होतो. विषय महिलेशी निगडित असल्याने मी पोलिसांत गेलो नव्हतो. मात्र, आता हेगडेंनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर मी देखील रीतसर तक्रार करणार आहे.’ असा खुलासा धुरी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like