Repo Rate Cut : गृहकर्ज, कार लोन झालं स्वस्त; RBI कडून रेपो रेट मध्ये कपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate Cut । नवीन वर्षाच्या तोंडावर भारतीय रिजर्व बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली आहे, ज्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा हप्ता, गाडीचे लोन स्वस्त होणार आहे. दर महिन्याच्या या खर्चाला काहीसा लगाम बसणार आहे. आज आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो रेट मध्ये ०.२५% कपात करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रेपो रेट ५.२५% पर्यंत खाली आला. यापूर्वी, आरबीआयने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये दर कपात केली होती. रेपो रेट सातत्याने कमी होत असलयाने सर्वसामान्य मांसल फायदा होतोय .

यंदाच्या वर्षात आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये एकूण तीनवेळा कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट 1 टक्क्याने खाली आला होता. यामध्ये आता आणखी 0.25 बेसिस पॉईंटची भर पडली आहे. यापूर्वी, रिजर्व बँकेने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेट मध्ये कपात केली होती. याचा अर्थ असा की चालू कॅलेंडर वर्षात, आरबीआयने सहापैकी चार बैठकांमध्ये रेपो रेट मध्ये १.२५% ने कमी केला आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये, आरबीआयने रेपो दर कायम ठेवला होता. येत्या काळात आणखी रेपो दर कपात करण्याची शक्यता आहे. रेपो दरात कपातीचा अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल, कारण स्वस्त कर्जांमुळे मागणी वाढेल आणि आर्थिक घडामोडीना चालना मिळेल. Repo Rate Cut


रेपो रेट म्हणजे काय? Repo Rate Cut

रेपो रेट (Repo Rate) म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्यावसायिक बँकांना अल्पकालीन निधी देण्यासाठी जो व्याजदर वापरते, तो दर. सोप्या भाषेत, बँका RBI कडून ज्या दराने पैसे घेतात, त्या दराला रेपो रेट (Repo Rate) म्हणतात. रेपो रेटचा उपयोग RBI अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी करते. जर रेपो रेट जास्त असेल तर कर्ज घेणे महागते आणि पैशांचा पुरवठा कमी होतो. तर रेपो रेट कमी झाल्यास कर्ज स्वस्त होते, पैशांचा पुरवठा वाढतो, आणि आर्थिक वाढीला चालना मिळते.