हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate Cut । तुम्ही जर गृहकर्ज घेतलं असेल, किंवा कार लोन सह कोणता EMI भरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये तब्बल 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट बाबत घोषणा केली. यापूर्वी रेपो रेट ६ टक्क्यांवर होता, तो आता ५.५० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा हप्ता, कार लोन किंवा इतर कोणतेही EMI आता कमी होतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा झालाय. मात्र, आता बँकांकडून तातडीने रेपो रेटमधील कपातीनुसार व्याजदर घटवले जाऊ शकतात का, हे पाहावे लागेल.
अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल-
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात (Repo Rate Cut) केली जाण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली जात होती, अखेर ती पूर्ण झाली. देशभरात महागाईचा दर आटोक्यात आल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांच्या हातात अधिक पैसा खेळता राहावा आणि बाजारपेठेत मागणी वाढावी, या उद्देशाने रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हंटल की, महागाई दर ४% च्या खाली आहे आणि देशाची जीडीपी वाढ देखील समाधानकारक आहे. त्यामुळे रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बाजारात वापर वाढेल, अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल.
हे पण वाचा : आता Flipkart वरून कर्जही मिळणार; RBI ने दिली परवानगी
गृहकर्जाचे दर ७.५ टक्क्यांपर्यंत खाली येतील- Repo Rate Cut
यावर्षी रेपो रेट मध्ये तिसऱ्यांदा कपात (Repo Rate Cut) झाली आहे. यापूर्वी, फेब्रुवारी आणि एप्रिलच्या चलनविषयक धोरण आढाव्यात, आरबीआयने रेपो रेट मध्ये २५-२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. यावर्षी जवळपास १०० बेसिस पॉईंट ने रेपो रेट कमी झाला आहे. त्यामुळे तुमच्या गृहकर्जावरील व्याजदरही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. यंदा तिसऱ्यांदा रेपो रेट मध्ये कपात झाल्याने गृहकर्जाचे दर पुन्हा एकदा ७.५ टक्क्यांपर्यंत खाली येतील. जर तुम्ही २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज फेडत असाल तर तुमचा EMI २००० रुपयांपर्यंत स्वस्त झाला असेल.
CRR मध्ये १०० बेसिस पॉइंट्सची कपात–
आरबीआयने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) देखील १०० बेसिस पॉइंट्सने कमी करून तो ३ टक्क्यांवर आणला आहे. पूर्वी हा दर ४ टक्के होता. ही रक्कम बँकांना नेहमीच रोख स्वरूपात ठेवावी लागते. आता CRR रेशो कमी केल्याने बँकांना कर्ज देण्यासाठी अधिक पैसे उपलब्ध होतील.