हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगणा राणावतच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत ते पाडले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेक नवख्या पत्रकारांनी BMC कर्मचारी समजून चक्क एका पोस्टमनला घेरून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आपने कंगना का ऑफिस क्यू तोडा ??? असा प्रश्न विचारताच आपण ते बांधकाम तोडलं नाही, मी तर पोस्टमन आहे असं तो पोस्टमन ओरडून सांगत होता. तरीही त्याच काहीही म ऐकता पत्रकार त्याच्या जवळ माईक नेऊन त्याला प्रश्न विचारतच राहिले.
https://twitter.com/tweetsvirat/status/1303645095749582848?s=20
आश्चर्यकारक बाब म्हणजे टीव्ही वाल्याना त्या पोस्टमनच्या ड्रेस वरील भारतीय डाक चा लोगोही दिसला नाही. अखेर त्या पोस्टमनने पत्रकारांच्या गराड्यातून पळ काढला आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत केवळ 6 दिवसांसाठी राहायला आली असल्यामुळे मुंबई महापालिकेने तिला होम क्वारंटाइन केलेलं नाही.