Sunday, May 28, 2023

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच आता टी-२०च्या आयोजनावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीने युएईला स्टॅडबाय ठेवले आहे. जर कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर तर ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाईल. टी-२० वर्ल्डकपसाठी अजून ६ महिने शिल्लक आहेत. आणि आयसीसीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

२०२१चा टी-२० वर्ल्डकप नियोजित वेळेनुसार ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार होता. पण कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे २०२१ मध्ये तो भारतात आयोजित करण्यात येणार आहे. युएईमध्ये भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या असल्यामुळे तिकडे स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच युएई क्रिकेट बोर्डाचे आणि बीसीसीआयचे संबंध चांगले असल्यामुळे तिकडे काही अडचण निर्माण होणार नाही. तसेच मागील आयपीएल युएईमध्येच आयोजित करण्यात आली होती.