प्रजासत्ताक दिन विशेष | हा दिवस शाळा, कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजांमधे कवायती, भाषणे, विविध कार्यक्रम केले जातात.
ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते. या सारखेच संचलन भारतातील सर्व राज्यांत आयोजीत केले जाते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
इतर महत्वाचे –
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…
आणि भगतसिंहांना फाशीची शिक्षा देण्यात आली
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे कणखर नेतृत्व : लोकमान्य टिळक