तारीख पे तारीख! अर्णव गोस्वामींचा तुरुंगातील मुक्काम वाढला; आता सुनावणी सोमवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अर्णवसह अन्य दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही सुनावणी आजही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. (Arnab Goswami Police Custody hearing Postpone)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना देखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.

आज काय घडले कोर्टात?
आज कोर्टात अर्णव यांच्या वकीलांनी आजची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच कोठडीवर सुनावणी सुरु होण्याअगोदर तिन्ही आरोपींच्या वकीलांनी पोलिसांकडे दाखल केलेली पोलीस कोठडीसाठी रिवीजन कॉपी इंग्रजीमध्ये अनुवाद करुन कोर्टाकडे मागितली. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. आरोपींचे तिन्ही वकील हे मराठी आहेत. या अगोदर कोर्टाचे सर्व कामकाजाचे पेपर मराठीमध्ये झाले आहे. त्यावर आरोपीच्या वकीलांनी मुख्य न्यायदडांधिकारी कोर्टात युक्तीवाद केला आहे.

अलिबाग सत्र न्यायालयाचे कामकाज हे मराठीमध्येच चालते. त्यामुळे आरोपीकडून इंग्रजी कॉपीची केलेली मागणी हा निव्वळ टाईमपास आहे. त्यामुळे आरोपीच्या वकीलांची मागणी फेटाळण्यात यावी, असे सांगत सत्र न्यायाधीश आर जे मल्लशेट्टी यांच्या कोर्टाने इग्रंजीमध्ये अनुवादाची ही मागणी फेटाळून लावली. त्यानतंर आरोपींच्या वकीलांकडून हायकोर्टात काही विषयांवर सुनावणी चालू असल्याचे पेपरवर्क सादर करण्यात आले. त्यानुसार पोलीस कोठडीवरील सुनावणी स्थगित करण्यात यावी अशी मागणी आरोपीच्या वकीलांकडून कोर्टाकडे करण्यात आली. त्यावर निर्णय देत कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment