रायगड । रिपब्लिक टिव्हीच्या तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह, प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अटक करुन कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टानं त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या तिघांनी पहिल्यांदा या परिसरात इम्तियाज खत्रीचा बंगला कुठं आहे विचारलं. त्यानंतर एका व्यक्तिला मुख्यमंत्र्यांचा बंगला कुठंय असं विचारलं त्यावर त्या व्यक्तिने माहित नाही असं सांगितलं. त्यानंतर हे तिघे पत्रकार तिथून निघून गेले. नंतर पुन्हा तिथं आले तर तो व्यक्ती बंगल्यात दिसला. त्यावेळी खोटं का बोलला म्हणून या तिघा पत्रकारांनी त्या कर्मचाऱ्याला शिविगाळ करत मारहाण केली आणि तिथून पळून गेले. नंतर त्या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली आणि नाकाबंदी लावून या तिघांना खानापूर हद्दीत पकडलं गेलं. विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
खालापुर तालुक्यातील भिलवले येथील फार्महाऊस येथील ही घटना आहे. सुरुवातीला हे पत्रकार होते की नाही याबाबत शंका होती. नाकाबंदी करुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ते पत्रकार असल्याचं समोर आलं, अशी माहिती मिळाली आहे. विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सध्यांकाळी 7.30 च्या दरम्यान टुरीस्ट कारने आलेल्या तीन व्यक्तींना चौकशी केली. फार्महाऊस वरील सुरक्षारक्षकांनी गाडी नंबर मुंबई पोलीसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. दरम्यान, खालापूर व फार्महाऊसवर पोलीसांची कुमक व दंगल नियत्रंण पथकाचा बंदोबस्त वाढविला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.