साताऱ्यात विनंती मोर्चा : सरकारने वनमजूरांना चाकरी सोडून नोकरीत घेण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडेक

सातारा, सांगली व नागपूर जिल्ह्यातील वनमजूरांना नोकरीत कायमस्वरूपी करण्यात यावे, या मागणीसाठी सातारा येथील वनविभाग कार्यालया समोर आज दि. 2 मार्च रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वनपाल व वनमजूर संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भिसे म्हणाले, 1994 ते 2022 पर्यंत आम्ही सलग पध्दतीने काम करत आहोत. शासनाने फ 12193 ची फाईल तयार केलेली आहे. परंतु त्यास अद्याप मंजूरी मिळालेली नाही. आज आम्ही सहकुटुंब आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा फाईल मंजूर करून आम्हांला चाकरीतून नोकरीत घ्यावे अशी, मागणी सर्व वनमंजूरांची आहे. वनमंजूर जंगलातील सर्व काम करणारा घटक आहे. 2014 पासून आम्ही आंदोलन करत आहोत तरी आम्हांला न्याय मिळाला नाही. तेव्हा आमचा विचार करून कायमस्वरूपी करावे.

अशोक सुर्यवंशी म्हणाले, आम्ही वारंवार या प्रश्नावर आंदोलन छेडलेले आहे. तेव्हा शासनाने आमचा विचार करून फाईलला मंजूरी द्यावी. आजचा विनंती मोर्चा काढण्यात आला आहे. मंत्रालयात बऱ्याच दिवसापासून ती फाईल पडून आहे, तेव्हा आता आमचा अंत न पाहता न्याय द्यावा, हीच विनंती

Leave a Comment