रेस्क्यू ऑपरेशन : कोयना वसाहतमधील लाल तोंडाची दोन माकडे जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेली कित्येक दिवसापासून कोयना वसाहत परिसरात धुमाकूळ घालणारी ती दोन लाल तोंडाची माकडे अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. कोयना वसाहत व परिसरातील नागरिकांनी या माकडांना पिंजऱ्यात जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले.

कोयना वसाहतमध्ये दोन लाल तोंडाच्या माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. लाल तोडांची माकडे लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना जखमी करणे. दुकानातून घरातून खाद्यपदार्थ हिसकावून घेऊन जाणे, झाडांचे चारचाकी गाड्यांचे नुकसान करणे असे प्रकार करत होते. दरवाजा उघडा दिसला की घरात घुसणाऱ्या या माकडांमुळे कोयना वसाहत मधील नागरिक वैतागले होते. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर कोयना वसाहत ग्रामविकास अधिकारी दिपक हिनुकले, पोलीस पाटील फिरोज मुल्ला यांनी याबाबत वनविभागाला सांगितल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रमेश जाधवर योगेश बेडेकर भरत पवार पोलीस पाटील फिरोज मुल्ला तसेच रेस्क्यू टीमचे हर्षद सर कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाघमारे आणि अमोल यांनी चार तास अथक परिश्रमाने त्या रेस्क्यू ऑपरेशन करून त्या दोन लाल तोंडांच्या माकडांना जेरबंद केले. या माकडांना कोयना जंगल परिसरात सोडून देण्यात आले. या टीमने केलेल्या कामगिरीबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment