नवी दिल्ली | एस.सी/एस.टी ना नोकरीत आणि शिक्षणात जसे आरक्षण आहे त्याच प्रमाणे त्यांना पद बढतीला ही आरक्षण द्यावे अशी मागणी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. एस.सी/एस.टी सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांच्यावर हजारो वर्षा पासून अन्याय होतो आहे. परिणामी त्यांना त्यांची प्रगती साधता आली नाही. त्यामुळे त्यांना पद बढतीत ही आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केंन्द्र सरकारने न्यायालयाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
भारताचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी कलम ३३५ नुसार एस.सी/एस.टी च्या सामाजिक उन्नतीसाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे असे मत सुप्रीम कोर्टासोमोर सांगितले आहे.