मोठी बातमी!! धनंजय मुंडे राजीनामा देणार?? अखेर ठराव मंजूर

0
4
Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati SambhajiNagar) येथे सुरू असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात (Rebel Literature Conference) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या संमेलनात एकूण 29 ठराव मंजूर करण्यात आले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा ठराव म्हणजे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा. मधल्या काळामध्ये धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चांगलेच वादात सापडले होते. त्यामुळे, त्यांच्या राजनाम्याची तीव्रतेने मागणी केली जात आहे. आता विद्रोही साहित्य संमेलनात देखील त्यांच्या राजीनामाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर काही काळापासून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. विरोधकांनी आधीच त्यांना राजीनाम्याची मागणी केली होती, आता या मागणीला विद्रोही साहित्य संमेलनानेही पाठिंबा दिला आहे. राजकीय नैतिकतेच्या दृष्टीने मंत्रीपदाचा त्याग करावा, असे संमेलनातील ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, विद्रोही साहित्य संमेलनात एकूण 29 ठराव मांडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय विषयांचा समावेश आहे. मात्र या सगळ्यात मुंडे यांच्या राजीनामाच्याचा ठराव केंद्रस्थानी राहिला आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड यांच्यासोबत असलेले जवळचे संबंध यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. आता विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. ही मागणी लक्षात घेऊन आणि या प्रकरणाला गांभीर्याने घेत विद्रोही साहित्य संमेलनात मुंडे यांच्या राजीनाम्याला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.