औरंगाबाद । गेल्या १४ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. अशात संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी औरंगाबाद प्रशाशनाने अनेक निर्बंध शहरात घातले आहे. त्यात हॉटेल, बार, रेस्टोरंटमध्ये फक्त पार्सल सुविधा सुरु आहे. अशात आधी नफा कमवण्यासाठी काही लोक जनतेच्या जीवाशी खेळताना दिसतात.
अवैध्य पद्धतीने रेस्टोरंट सुरु ठेऊन.बीड बायपास येथील अनेक हॉटेल मध्ये अशीच मद्य विक्रीसह बैठका हि सुरु आहे. त्यातीलच एक बीड बायपास वरील जिव्हाळा रेस्टोरंट हे दिखील आहे. संध्याकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत या रेस्टोरंट मध्ये मद्यपींची गर्दी दिसून येते. यातच दुप्पट भावाने दारू विक्री होता आहे.
जिव्हाळा हॉटेल हे चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येते. दवसातून किमान पाचशेच्या वर पेईंची वर्दळ इथे असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो. अशी माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे. बीड बायपास वरील सर्व हॉटेलकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे.