उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट खाद्यगृहे पूर्णत: राहणार बंद

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शि.बा. कोडगिरे यांची माहिती

औरंगाबाद | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाने 5 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार 5 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत मिशन ब्रेक द चेननुसार अन्न आस्थापनाबाबत उपाययोजनांची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यात उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृह पूर्णत: बंद राहतील. मात्र पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहील. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरु ठेवता येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शि.बा. कोडगिरे यांनी कळविले आहे.

अन्न पदार्थांची होम डिलिव्हरी सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत या वेळेत सुरु राहील. होम डिलीव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण चाचणी निगेटीव्ह झालेले असणे आवश्यक आहे. अटी शर्थीसह हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृह किराणा दुकाने सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पार्सल सुरु ठेवता येतील. होम डिलीव्हरी व त्यासाठी स्वयंपाकगृह रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल. सर्व औषध विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रात्री 8 नंतर व्यवसाय चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. तथापि त्यांनी रात्री 8 वाजेनंतर केवळ औषध विक्री करावी. रात्री 8 वाजेनंतरच्या कालावधीत त्यांनी आईस्कीम, थंडपेये इत्यादी कोणत्याही अन्न पदाथार्ची विक्री करु नये.

ज्या आस्थापनांना या कालावधीत 5 मार्च 2021 ते 30 एप्रिल 2021 व्यवसाय सुरु राहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या आस्थापनांशी संबंधीत सर्व मालक, चालक, कर्मचारी, मजूर व तेथील कार्यरत सर्व व्यक्तींना कोवीड-19 च्या अनुषंगाने दर 15 दिवसांनी वारंवार तपासणी करणे बंधनकारक राहील. नजीकचा तपासणी अहवाल जवळ बाळगणे अनिवार्य असेल. तसेच कोवीड-19 च्या अनुषंगाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.

जिल्ह्यातील अन्न आस्थापनांनी 4 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार 5 मार्च ते 30 एप्रिल 2021 पर्यंत काटेकोरपणे पालन करावे, या कार्यालयाने सदर कामी 3 पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत या आदेशाची अंमलबजावणी होते किंवा कसे याबाबत नियंत्रण ठेवण्यात येईल. उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शि.बा. कोडगिरे यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like