औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या जरी आटोक्यात आली असली तरी संसर्गाचा नवा डेटा प्लस हा घातक व्हेरिएंट समोर आला आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच सरकारने सोमवारपासून शहरात निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु राहतील इतर दुकाने दर शनिवार रविवार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
सध्या ग्रामीण भागात निर्बंध कडक आहेत मात्र, आता मनपाच्या हद्दीतही ते लागू होतील सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर याबाबतचा आदेश काढला जाईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच स्प्ष्ट केले आहे. त्यानुसार आदेश निघताच त्याची तत्काळ म्हणजेच सोमवारपासूनच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
अजून तरी डेटा प्लस चा एकही रुग्ण औरंगाबादेत सापडलेला नाही. दरम्यान लॉकडाऊनमुळे यापूर्वीच मोठे नुकसान झाले. त्यामुळे शनिवार व रविवार बाजारपेठ बंद ठेऊ नये, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.