सातारा जिल्ह्यातील निर्बंध 15 मे पर्यंत “जैसे थे” 

सातारा | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो रोखण्यासाठी सद्यस्थितीत चालू असलेले निर्बंध 15 मे पर्यंत तसेच ठेवण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिलेले आहेत.

सातारा जिल्ह्यात दिनांक 14, 19, 20 व 22 एप्रिल रोजी दिलेले आदेश 15 मे 2021 पर्यंत 7 वाजेपर्यंत लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे असून त्यासाठी वरील आदेशानुसार निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, असे आज काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यात निर्बंधाविषयी माहीती मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, विभाग प्रमुख, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगरपंचायत- नगरपालिका, गटविकास अधिकारी आणि जिल्हा माहीती अधिकारी यांना कळविण्यात आली आहे.

You might also like