रेठरेच्या वेदांतिका मोहितेची आंतरराष्ट्रीय पिस्टल शूटिंगसाठी निवड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील वेदांतिका अविनाश मोहिते हिची दिल्ली येथे झालेल्या 64 व्या नॅशनल पिस्टल शूटिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पिस्टल शूटिंग निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. द नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक 18 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत 10 एम पिस्टल नॅशनल शूटिंग विजेता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र रायफल असोसिएशन मुंबईच्या वतीने कु‌. वेदांतिका मोहितेचे नामांकन देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याने वेदांतिका मोहिते हिची आंतरराष्ट्रीय ट्रायलसाठी निवड करण्यात आली. कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांची ती कन्या असून कृषी महर्षी आबासाहेब मोहिते यांच्या स्नुषा महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेत्या नूतन मोहिते यांची ती नात आहे.

वेदांतिका मोहिते हिच्या यशात तिचे आई-वडील, क्रीडा प्रशिक्षक सारंग थोरात, कुटुंबीय तसेच हितचिंतकांचा सहभाग असल्याचे तिने सांगितले. वेदांतिका हिच्या यशाबद्दल तिचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

You might also like