रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याची दुचाकी पळवणारा भामटा जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावली | रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याची गाडी पळवणारा भामटा कुडाळ पोलिसांनी जेरबंद केला आहे. राहुल दशरथ माळी (वय- 20, रा. तुपारी, जि. सांगली) या चोरट्याला पोलिसांनी दुचाकी मुद्देमालासह अटक केली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ परिसरामध्ये संशयितरित्या एक इसम मोटरसायकलवरून दिसून आला असता, पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांनी सदर इसमाची तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडून रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांची दुचाकी क्रमांक (एमएच- 03 सीजे- 0155) आढळली. याप्रकरणी मोटरसायकल चोरी प्रकरणी त्याच्यावर कुडाळ पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर संबंधित इसमाची अधिक तपासणी केली असता सांगली जिल्ह्यामध्ये घरफोडीसह चोरी आदी गुन्हे देखील दाखल असल्याचे कुडाळ पोलिसांनी सांगितले. दरम्यान सराईत आरोपी राहुल माळी यांच्याकडून पोलिसांच्या तपासात आणखीन काही गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, हेडकॉन्स्टेबल घोरपडे अधिक तपास करत आहेत

Leave a Comment